STATE NEWS: पाणी पिण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्या वर जबरदस्ती….

सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही....

नागपूर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): पाणी पिण्याचा बहाणा करून एका २२ वर्षीय तरुणाने थेट घरात शिरून तरुणीवर जबरदस्ती केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१० जून) रात्री १० वाजता हिंगणा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव हितेंद्र संतलाल मंडलिये (वय २२, रा. भंडारा, सध्या हिंगणा) असे आहे. तो गुमगाव येथील एका कंपनीत काम करतो. याच कंपनीत पीडित १९ वर्षीय तरुणीही कार्यरत आहे. ती मूळची वर्धा जिल्ह्यातील असून कामासाठी हिंगण्यात वास्तव्यास आहे.

मंगळवारी रात्री वर्धा येथून हिंगण्याला परतत असताना हितेंद्रने तिला दुचाकीवरून घरी सोडले. घरी पोहोचल्यावर त्याने पाणी पिण्याचा बहाणा केला आणि तिच्या पाठोपाठ बेडरूममध्ये शिरला. त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याप्रकरणी तरुणीने हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक उपनिरीक्षक अरविंद नाईक यांच्या तपासाअंती हितेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!