दुःखद घटना! पंढरपूर वारीत कवठळच्या तरुण वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

दुःखद घटना! पंढरपूर वारीत कवठळच्या तरुण वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

पंढरपूर, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या कवठळ येथील ४० वर्षीय रामदास निंबाजी पडघान यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेने कवठळ गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. याच वारीनिमित्त कवठळ येथील काही भाविकांसह रामदास पडघान हे पंढरपूरला गेले होते. शनिवारी सकाळी दर्शनापूर्वी त्यांनी गावातील मित्रांसमवेत चंद्रभागा नदीत स्नान केले. स्नानानंतर दर्शनासाठी निघाले असताना, वाटेत चहा घेतल्यानंतर रामदास यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे पाहून सोबतच्या मित्रांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

BREAKING: पंढरपूरहून परतणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; 15 वारकरी जखमी! चिखली- मेहकर फाटा रोड वर वरील घटना…!

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मर्ग दाखल केला. रामदास यांच्या निधनाची वार्ता गावात पोहोचताच गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त झाला. पंढरपूरला गेलेले गावातील सर्व भाविक रामदास यांचा मृतदेह घेऊन शनिवारी रात्री उशिरा गावी परतले. यानंतर त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास पडघान हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेकांनी रामदास यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!