हेअर सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला; तेथील दुकानातली कैची घेऊन वार…;दोघा मध्ये तुफान….

लग्नात नवरदेवाच्या समोर तलवार घेऊन नाचण्याला विरोध केला अन्…चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

मेरा बु (कैलास आंधळे -बुलडाणा कव्हरेज न्युज) –जुन्या कौटुंबिक वादातून दोन नातलगांमध्ये गावातील हेअर सलूनमध्ये वाद उफाळून धक्कादायक घटना घडली. दाढी करत असताना झालेल्या वादात एकाने कैचीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याच्या हाताला चावा घेऊन जखमी केले.ही घटना ३ जून रोजी अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसरुळ गावात घडली.

शेख रशीद शेख अब्दुल (वय ३५) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मुका आणि बहिरा आहे. त्यांच्या घराच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे केलेल्या अर्जावरून गावातीलच त्यांचे नातेवाईक शेख हुसेन शेख दादू यांनी वाद निर्माण केला.घटनेच्या दिवशी शेख हुसेन हे गावातील एका हेअर सलूनमध्ये दाढी करत होते. त्यावेळी शेख रशीद हे दुकानात गेले आणि “आमच्या घरगुती प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करू नका,” असे सांगताच त्यांनी हुसेन यांची कॉलर पकडली. या क्षुल्लक वादातून शेख हुसेन यांनी रागाच्या भरात शेख रशीद यांच्या उजव्या हाताला दाताने चावा घेतला आणि टेबलावरील लोखंडी कैची उचलून वार करण्याचा प्रयत्न करत, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.घटनेत मोठा अनर्थ होऊ नये म्हणून दुकानमालकाने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत दुकानातील खुर्ची तुटली आणि दोघांनाही कैची लागून रक्तस्राव झाला.

या प्रकरणी शेख रशीद यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी शेख हुसेन शेख दादू याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास बिट जमादार देढे करत असून, ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!