अंढेरा (नंदकिशोर देशमुख : बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमोना चौफुलीवर गोमांसाची अवैध तस्करी करणाऱ्या युवकाला पाठलाग करुन पकडण्यात आले. या वेळी आरोपीकडून ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई २६ सप्टेबर रोजी सकाळी घडली.मिळालेल्या माहितीनुसार एक आरोपी दुचाकी क्रमांक (एमएच २८ एचझेड ११४०) वरून गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गावातील काही युवकांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे गावातील युवकांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला. याची भनक युवकाला लागताच त्याने दुचाकी जोरातपळवली. या घटनेची माहिती ठाणेदार रुपेश शंकरगे यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. सदर युवकाचा पाठलाग करून चौफुली येथे त्याला पकडण्यात आले. त्यावेळी आरोपीची चौकशी केली असता आरोपी हा जाफ्राबाद येथील बाजारपेठ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. त्याची झडती घेतली असता दुचाकीवर जनावराचे मांस असल्याचे कबूल केले. पोलिसांनी ताबडतोब आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अष्टविनायक देविदास मोरे यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख असलम शेख साडू (५५) याच्याविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोना – शेळगाव आटोळ चौफुलीवर ५० किलो गोमांस जप्त; आरोपीस अटक!
Published On: September 27, 2025 10:32 am












