
चिखली (उद्धव पाटील, बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील रोहडा शिवारात १६ एप्रिल रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पूर्वी आमदरी नावाने ओळखले जाणारे, सध्या पूर्णपणे ओसाड पडलेले गाव पुन्हा चर्चेत आले आहे. या गावात अज्ञात व्यक्तींनी सुमारे १० बाय १० फुटांचा खड्डा खोदल्याचे आढळले असून, त्या ठिकाणी काळ्या जादूसाठी वापरले जाणारे पूजेचे साहित्य सापडले आहे. खड्डा अर्धवट बुजवलेला असल्याने, त्यात काही संशयास्पद वस्तू (Guptadhan) गाडली गेली आहे का, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
गाव ओसाड का झाले?
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी या गावात एका व्यक्तीने आत्महत्या केल्यापासून गाव ओसाड पडले. गावातील बहुतांश रहिवाशांनी रोहडा आणि गांगलगाव येथे स्थलांतर केले आहे. गावात आता फक्त काही जुन्या घरांचे अवशेष आणि एक जिर्णोद्धारित मारुती मंदिर आहे.
M S Dhoni: महेंद्रसिंग धोनीला दुखापत, IPL 2025 चे उरलेले सामने खेळणार का? चाहत्यांमध्ये चिंता
गुप्तधनासाठी काळी जादू?
या गावात एक जुनी गढी (वाडा) असल्याने, तिथे गुप्तधन लपवले असावे, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. या गुप्तधनासाठी काळी जादू किंवा अघोरी पूजेचा वापर केला गेला असावा, अशी शक्यता घटनास्थळावरील वस्तूंवरून व्यक्त केली जात आहे. खड्ड्याजवळ सापडलेल्या पूजेच्या साहित्यावरून टोनाटोणा किंवा इतर संशयास्पद विधी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
नरबळीची भीती?
गुप्तधन काढण्यासाठी काही प्रकरणांमध्ये मांत्रिक बळी देण्याचे प्रकार घडल्याच्या घटना राज्यात यापूर्वी समोर आल्या आहेत. या प्रकरणात अशी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांना सतर्क राहावे लागेल. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपास तातडीने सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
6 thoughts on “Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…”