“फोनवर बोल नाहीतर आत्महत्या करतो” ; अल्पवयीन मुलीला धमकावून विनयभंग….!

धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मोताळा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला “फोनवर बोल नाहीतर आत्महत्या करतो” अशी धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी धा. बढे पोलिसांनी आरोपी किसना रमेश अंभोरे (वय २४) याच्याविरुद्ध पोक्सो सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी असलेल्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी वारंवार घराच्या दारातून मुलीकडे वाईट इशारे करत असे. यानंतर त्याने मुलीला फोनवर बोलण्यासाठी धमकावत मानसिक त्रास दिला.

घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75(1)(iv), 351(2)(3) आणि पोक्सो कलम 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोउपनि राहुल वरारकर हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!