बुलढाण्यात २९ नोव्हेंबरला क्रांतिकारी शेतकरी संघटनेची निर्णायक बैठक; शेतकरी नेते रविकांत तुपकर काय भूमिका घेणार..! शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन …विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी केले….

EXCLUSIVE: विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांना शेतकरी नेते रविकांत तुपकरानी पक्षाच्या पदापासून दूर का ठेवले?

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या ज्वलंत प्रश्नांवर निर्णायक दिशा ठरवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्वाची बैठक शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही तातडीची बैठक संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बोलावली असून जिल्ह्यात तिची मोठी चर्चा रंगली आहे.

बैठक सकाळी ११ वाजता, शिवगड हॉटेल (गोलांडे लॉन्स), चिखली रोड, बुलढाणा येथे होणार असून, शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी केले आहे.

बैठकीत चर्चिले जाणारे प्रमुख मुद्दे….

अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यावर आलेले संकट

शेतमालाचे पडलेले दर — मध्यप्रदेशच्या धर्तीवर सोयाबीन-कापूस भावफरक योजना महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी…..

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

प्रलंबित १००% पीक विमा तातडीने मंजूर करणे

जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकऱ्यांना कायमची मुक्तता आणि मजबूत कंपाउंडची मागणी

जळालेले शेती ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे

शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी स्वतंत्र शेतमजूर महामंडळ स्थापन करणे

या सर्व मुद्द्यांवर तीव्र संघर्षाची रणनीती बैठकीत ठरणार असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

रविकांत तुपकरांची उपस्थिती चर्चेचा केंद्रबिंदू…

अनेक आंदोलने उभारून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे रविकांत तुपकर हे या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन….

शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांनी या निर्णायक लढ्याला बळ द्यावे, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!