EXCLUSIVE:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक पाहता जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आणि हालचालींना वेग…

बुलडाणा (ऋषि भोपळे:- बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर जवळ आली आहे. उच्च न्यायालयाने सरकारला येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका अशा सर्वच स्तरांवरील निवडणुका लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विविध पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते आणि नेते आता तिकिटासाठी तयारीला लागले असून, अनेक जण पक्षांतर करताना दिसत आहेत. कुठे कुठे निष्ठावान कार्यकर्ते पक्षातच स्थिर आहेत, तर कुठे नवीन येणाऱ्यांना संधी मिळणार का, यावर चर्चा सुरु आहे.शिवसेना (उध्दव गट आणि शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट), भाजप, काँग्रेस आणि स्थानिक पातळीवरील इतर पक्षांनीही जोरात कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष आता ताकदीच्या जागा मिळवण्यासाठी रणनीती आखत आहे.

1. पक्षांतर्गत संघर्षाची शक्यता…..

अनेक जुन्या कार्यकर्त्यांना वाटते की नवीन पक्षांतर्गत येणाऱ्यांना तिकीट मिळू नये. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढू शकते. वरिष्ठ नेतृत्वाने यावर योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.

2. पक्षांतराचे वाढते प्रमाण:

सत्ता आणि संधीच्या शोधात अनेक नेते व कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

3. स्थानीक समीकरणांची पुनर्रचना:

प्रत्येक तालुका, पंचायत समिती आणि नगरपालिका स्तरावर स्थानिक पातळीवरील गट-तट, समाज-समूह यांचे समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे.

4. मतदारांचा मूड ठरवणार निकष:

विकासकामे, स्थानिक प्रश्न, मागील प्रतिनिधींची कामगिरी, पक्षाचे स्थानिक व प्रदेश नेतृत्व यावर मतदारांचे निर्णय अवलंबून असतील.

बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. इच्छुकांचे प्रयत्न, पक्षांची रणनीती आणि मतदारांचा कल या साऱ्यांवर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवरच जिल्ह्याचे भविष्य अवलंबून असेल.

काम करणाऱ्यांना मिळू शकते संधी …

निवडणूका लागल्यानंतर अनेक नवखे नेते तयार होतांना दिसतात तर राज्य पातळीवरील फोडाफोडीचे राजकारणामुळे पक्षावरील विश्वास नसल्याचे जनतेचा सुर असून जनता आता सुज्ञ झाली असल्याने जे तळागळात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झटतात त्यांना जनता कौल दैणार असल्याचे चित्र या निवडणुकीत पहावयास मिळू शकते

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!