उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इसरूळ येथे; संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यात होणार सहभागी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इसरूळ येथे; संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यात होणार सहभागी

बुलडाणा ((कैलास आंधळे/नंदू देशमुखबुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज, १२ मे २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. चिखली तालुक्यातील इसरूळ गावात संत चोखोबाराय यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य धार्मिक सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची शिवचरित्र कथा. उपमुख्यमंत्री शिंदे या कथेला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीलाही हजेरी लावणार आहेत.

इसरूळ येथे संत चोखोबारायांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. १० मेपासून सुरू झालेला हा पुण्यतिथी सोहळा १८ मेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत दररोज सकाळी १० ते दुपारी १२ आणि रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे हरीकीर्तन होत आहे. मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी भाविकांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

डॉक्टरचे अपहरण; तीन लाखांची खंडणी उकळून डॉक्टरांचा थरारक पलायन प्रवास…

हा धार्मिक सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इसरूळ गावात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काल अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी गावाला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. भाविक आणि स्थानिक नागरिकांसाठी सर्व आवश्यक व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मिनिट टू मिनिट दौरा

  • दुपारी २:१५ वाजता: छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन
  • दुपारी २:४५ वाजता: हेलिकॉप्टरने इसरूळ येथील हेलिपॅडवर आगमन
  • दुपारी ३:०० ते ५:००: संत चोखोबाराय मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती, शिवचरित्र कथेला हजेरी आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीत सहभाग
  • सायंकाळी ५:०० नंतर: हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे परत प्रवास

संत चोखोबाराय यांचा पुण्यतिथी सोहळा हा बुलडाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. यंदा स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या शिवचरित्र कथेमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे आकर्षण आणखी वाढले आहे.

इसरूळ येथे संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात!शिवचरित्र आणि भव्य कीर्तन सोहळ्यांची …

मंदिर विश्वस्तांनी सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होऊन संत चोखोबाराय यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आणि शिवचरित्र कथा यामुळे इसरूळ गाव आज भाविक आणि पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इसरूळ येथे; संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यात होणार सहभागी”

Leave a Comment

WhatsApp Join Group!