मोताळा बसस्थानकात दोन तरुणांमध्ये जोरदार मारामारी; दोघांवर गुन्हा दाखल…

तू दगड लावू नको, इथून निघून जा,आता लगेच याला जीवाने सोडत नाही! असे म्हणत म्हणत डोक्यात लोखंडी रॉड ने जोरदार.....

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – येथील एसटी बसस्थानक परिसरात दोन तरुणांमध्ये वादातून हाणामारी झाली. ही घटना १ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अचानक सुरू झालेल्या या भांडणामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

फर्दापूर गावचा सुदाम रामराव व्यवहारे आणि वाघजाळ येथील किरण ऊर्फ आकाश गणेश गाडेकर यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यामुळे बसस्थानक परिसरात घबराट पसरली.

या झटापटीत दोघेही किरकोळ जखमी झाले असून, बोराखेडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!