डोंगर शेवलीच्या 19 वर्षीच्या ऋतुजा सावळेचा अपघातात मृत्यू….. डॉक्टर बनण्याचे स्वप्न अर्ध्यावर राहिले….

धोडप (राधेश्याम काळे: बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथे डोंगर शेवली वरून बुलढाणा कडे जात असतानाअपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईवडीलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ऋतूजा सावळे हीने प्रचंड मेहनत घेतली. तिच्या वडीलांनी सुध्दा तिला डॉक्टर बनविण्यासाठी खुप प्रयत्न केले. डॉक्टर व्हावी यासाठी ऋतुजाला परदेशात सुध्दा पाठविण्याची तयारी गणेश सावळे यांची होती. परंतू तिचा राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षणासाठी नंबर लागला. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. आज ऋतुजा कॉलेजसाठी निघाली डोंगर शेवली गावापासून काही अंतरावर जात नाही तर तिच्यावर आज काळाने घाला घातला अन् तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्ध्यावर राहिले.ऋतुजा गणेश सावळे वय १९ रा. डोंगरशेवली ही राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय बुलढाणा येथे प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ऋतूजा कॉलेजकडे येण्यासाठी निघाली होती. याच दरम्यान ती बजाज चेतक गाडीवर होती. त्यावेळी बसच्या बाजूला ती गाडी चालवत होती. समोर जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने ऋतूजाला धडक दिली. या धडकेमुळे ती एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले. यामध्ये ती खाली कोसळली आणी यात गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऋतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावासह पंचक्रोशी शोककळा पसरली आहे. तीच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा एमबीबीएस साठी सुध्दा पात्र झाली होती अशी माहिती कळते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!