सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील धान्दरवाडी येथे घडली.
पिराजी नामदेव पाटोळे (वय ३५) हे २२ ऑगस्ट रोजी गावालगतच्या खोरे तलावात बैल धुण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असताना दोन दिवसांनी, म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी, त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना सापडला.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.















