चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात: अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेस हाच पर्याय – ॲड. मोहतेशाम रजा

चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात: अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेस हाच पर्याय - ॲड. मोहतेशाम रजा

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशात धर्म आणि जातीय द्वेष पसरवणे हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्य अजेंडा आहे. याच आधारावर ते सत्तेत टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा द्वेष आणि भीतीच्या वातावरणात काँग्रेस पक्ष प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विशेषतः अल्पसंख्यांक समुदायाला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी. अल्पसंख्यांकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सत्तेत आल्यावर नक्कीच प्रयत्न करेल, असा विश्वास बुलडाणा जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. मोहतेशाम रजा यांनी व्यक्त केला.

गुरुवारी, १० जुलै २०२५ रोजी चिखली येथील जयस्तंभ चौकात राहुल भाऊ बोंद्रे यांच्या जनसेवा जनसंपर्क कार्यालयात चिखली शहर काँग्रेस आणि अल्पसंख्यांक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत ॲड. मोहतेशाम रजा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला अल्पसंख्यांक चिखली शहराध्यक्ष खलील बागवान, काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्दीन काझी, नंदूभाऊ सवडतकर, डॉ. मोहम्मद इसरार, सचिन बोंद्रे, अमीनखा उस्मानखा, शहजादअली खान, भास्कर चांदोरे, जाकिरभाई, शकील भाई, व्यंकटेश रिंढे, बबलू एस. के., सादिक जमदार, अक्रम बागवान, शकील खान, अजीम खान, शोहेब बागवान, अब्दुल अजीज, मोहीम जमदार, जफर खान, बाबा भाई, अखिल खान, अकिब खान, फारूक बॅग, साहेद भाई, बाशिद बागवान, माजिद बागवान, फैजान बागवान, अब्रार बागवान, जुनेद बागवान, मोसिन बागवान, वसीम मिर्झा, अक्रम मिर्झा, तोसीब शेख, आयान शेख, फैजान शेख, शोहेब खान, शाहिद बागवान, शहेजाद खान, विकार बागवान, आयफास बागवान, रियान खान, सलमान खान, शेख समीर, शेख शाहिद, अरबाज खान, आदित्य बनसोडे, रोहित कदम, शाहिद खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाची एकता टिकवण्यासाठी काँग्रेस आघाडीवर – खलील बागवान

यावेळी बोलताना अल्पसंख्यांक चिखली शहराध्यक्ष खलील बागवान यांनी काँग्रेसच्या सर्वधर्म समभावाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, “देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे आणि पक्षाला बळकट करावे.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!