चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील साकेगाव परिसरात बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कपिल खेडेकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, साकेगाव येथील शेतकरी कृष्णा नाना जाधव आणि भैय्या रात्री सुमारे आठच्या सुमारास शेतात पाईप बदलण्यासाठी गेले असता त्यांच्या समोर अचानक बिबट्या उभा राहिला.
धीर एकवटत कृष्णा नाना यांनी हातात असलेला बार बिबट्याकडे फेकताच बिबट्याने पळ काढत जंगलाकडे धाव घेतली. प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळल्याचे खेडेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान ग्रामीण व शहरी भागात वन्यप्राण्यांची वर्दळ वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खबरदारीचे उपाय म्हणून आता शेतकऱ्याने घेण्यासाठी
…रात्री तसेच दिवसा शेतात जाताना सावधगिरी बाळगा…घराचे दरवाजे सकाळी उघडण्यापूर्वी काही क्षण आवाज करा…ओपन गॅलरी, गच्ची, शांत जागा येथे प्राणी आसरा घेतात..सतर्क रहा..लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा.भागात वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती देऊन संयुक्त उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.













