चिखली नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी! डॉ. मीनलताई गावंडे गटनेत्या, इसरार जब्बार विरोधी पक्षनेते….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली स्थानिक नगरपरिषद निवडणूक २०२६ नंतर सत्ताधारी आघाडीच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संघटित भूमिका घेत आपला स्वतंत्र विरोधी गट अधिकृतपणे स्थापन केला आहे. या संदर्भातील गटनिहाय नोंद जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

सादर करण्यात आलेल्या नोंदीनुसार काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची १ अशा एकूण १३ नगरसेवकांचा हा विरोधी गट अस्तित्वात आला आहे. नगरपरिषदेत सत्ताधारी आघाडीला प्रभावी विरोध करण्याच्या उद्देशाने हा गट स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या विरोधी गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. मीनलताई निलेश गावंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. महम्मद इसरार अब्दुल जब्बार यांची निवड करण्यात आली आहे.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या गटाची अधिकृत नोंद करण्यात आली असून, आगामी काळात नगरपरिषदेतील निर्णय प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हा विरोधी गट सक्रिय भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!