चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):चिखली शहरात आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या पाटील हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे भव्य उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर हॉस्पिटलचे उद्घाटनसाठी मा. ना. प्रतापरावजी जाधव (केंद्रीय आयुष मंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी स्वय सहायक असणारे श्री विधाधर महाले साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच सौ. श्वेताताई महाले पाटील (आमदार, चिखली विधानसभा मतदारसंघ) यांची उपस्थिती राहणार आहे.
हे हॉस्पिटल तोरणा महिला अर्बन बँकेच्या बाजूला, खंडाळा रोड, चिखली येथे सुरू होत असून, नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास परमेश्वर पाटील (MBBS, MD – Medicine, DNB) असून त्यांनी मुंबई व नवी दिल्ली येथील नामांकित संस्थांतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.
पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयसीयू, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, ECG, मल्टीपॅरामिटर मॉनिटर, सिरिंज पंप, नेब्युलायझर, जनरल वॉर्ड तसेच २४ तास मेडिकल स्टोअर आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, थायरॉईड, संसर्गजन्य आजार, पोटाचे विकार, किडनी व लिव्हर आजार यांसह विविध आजारांवर निदान व उपचार केले जाणार आहेत.
या हॉस्पिटलमुळे चिखली व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार असून, गंभीर रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













