चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा चिखली शहरात लवकरच साकार होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सध्याच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागी हा नवीन पुतळा उभारला जाईल. यासाठी सध्या असलेला पुतळा हलवण्याच्या कामाला २५ जून २०२५, बुधवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यवाहीत तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्यासह शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
BIG BREAKING : सिंदखेड राजा तहसीलमध्ये ७ हजारांची लाच घेताना दोन महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!
चिखलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात १९८५ साली नगरपालिकेने शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. आता त्याच जागी अधिक भव्य आणि आकर्षक अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांनी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवल्या असून, या पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चिखलीतील शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या उद्देशाने आमदार श्वेताताईंनी हा प्रकल्प हाती घेतला आहे.
जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी ६ मे 2025 रोजी नगरपालिकेला पत्र पाठवून या प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली. या पत्रानंतर पालिका प्रशासनाने पुतळा हलवण्याच्या प्रक्रियेला गती दिली. सध्याचा पुतळा सुरक्षितपणे काढला जाणार असून, त्याखालील चौथऱ्याचे नव्याने बांधकाम केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या जागी स्थापन करण्यात येईल.
शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यवाहीत तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही कार्यवाही होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.