मेहकरात ‘चाळ्यांचा कॅफे’ उघडकीस; पोलिसांच्या धाडीत तीन अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पकडले…!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शहरातील काही कॅफेंमध्ये प्रेमीयुगुलांना मुक्तपणे चाळे करण्याची संधी दिली जात असल्याने शहराची संस्कृती आणि सामाजिक वातावरण धोक्यात येत असल्याची चिंता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मेहकर पोलिसांनी शहरातील एका संशयित कॅफेवर धाड टाकत तिथून तीन अल्पवयीन जोडप्यांना पकडले. ही कारवाई १० नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे बाराच्या सुमारास करण्यात आली.


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्या कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांसाठी वेगळ्या खोल्या, खासगी बसण्याची सोय, आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शहरात अशा प्रकारचे सहा ते सात कॅफे सेंटर सुरू असल्याचे समोर आले असून या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या अयोग्य वर्तन होत असल्याची तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.


छाप्यामध्ये तिन्ही जोडपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, या कॅफेत बसण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये आकारले जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुले-मुली चुकीच्या मार्गावर जात असल्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, समाजातील अशा प्रवृत्तीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!