बुलडाणा (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांचे अंत्यत जवळचे मानले जाणारे बुलडाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असली तरी त्यांच्या स्वताच्या जिल्ह्यातच काँग्रेस पक्षाचा बुरुज ढासळताना दिसत आहे. ही परिस्थिती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
एका बाजूला काँग्रेसचे नेतृत्व पक्षाच्या विस्तारासाठी धडपड करत असताना, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आणि माजी पदाधिकारी मात्र एकामागोमाग इतर पक्षांत सामील होत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायदे यांनी महायुतीत प्रवेश करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून थेट विधानसभा गाठली.
तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेस पक्षाच्या मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख अशा जयश्री ताई शेळके यांनी सुद्धा शिवसेनेट प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे कॉग्रेसची महिला आघाडी नक्कीच कमजोर झाली आहे.
चिखली – ‘राजकीय राजधानी’तही काँग्रेसला गळती!
चिखली मतदारसंघ हा बुलडाणा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो मात्र येथील राहुल बोद्रे यांचे अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला आहे तर अनेकजण पक्षप्रवेशाच्या वाटेवर आहेत तर काही शिंदे गट किंवा अजितदादा गटात प्रवेश घेत असल्याने कॉग्रेस पक्षासाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
खामगावचे सानंदा पण घेणार ‘उडी’?
खामगावचे माजी काँग्रेस आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतः दिले आहेत. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची एकेक वेळची मजबूत मदार आता अक्षरशः ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ज्या जिल्ह्यातून नेतृत्व मिळाले, तिथेच नेतृत्व हरवते आहे का?
ही परिस्थिती विशेष गंभीर आहे कारण काँग्रेसने ज्यांना संपूर्ण राज्याच्या संघटनात्मक जबाबदारीची सूत्रे दिली – तेच हर्षवर्धन सपकाळ – यांचा गड असलेला बुलडाणा जिल्हा काँग्रेससाठी अस्थिर ठरत आहे. आज ज्या कार्यकर्त्यांना “निष्ठावंत” म्हणत ओळखलं जात होतं, तेच आता महायुतीच्या दिशेने वळताना दिसत आहेत.
मासरुळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणुकीचं रणकंदन! महायुती की स्वबळाची चढाओढ?
पक्षाला गरज आहे नव्या रक्ताची आणि विश्वासाचा पुनर्बांधणीची…
सध्याच्या घडामोडी पाहता काँग्रेस पक्षाला केवळ नेते नव्हे तर खऱ्या अर्थाने लोकांशी जोडले गेलेले कार्यकर्ते, नव्या पिढीची साथ आणि पुन्हा एकदा विश्वास मिळवण्याची गरज आहे. अन्यथा “प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा” हा फक्त नावापुरता राहील आणि जमिनीवरून काँग्रेसची ओळख पूर्णतः नष्ट होईल.















1 thought on “EXCLUSIVE..प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच हळू हळू काँग्रेस ढासळत चालली? बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसची कार्यकर्ते एकामागोमाग दुसऱ्या पक्षात होत आहे सामील!”