बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने काही नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लावण्याची तयारी केली आहे.२९ नोव्हेंबर रोजी आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयीन अपील दाखल असलेल्या जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025 पाठवला. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील विवादित प्रभागांची माहिती आज जिल्हा प्रशासनाने आयोगाला सुपूर्त केली. बुलढाणा जिल्ह्यात कुठल्या ठिकाणांवर परिणाम?जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील नगरपरिषदांच्या प्रभागांवर अपील प्रलंबित असल्याचे कळवले :🔹 देऊळगाव राजा — नगराध्यक्षपद🔹 खामगाव — प्रभाग ५अ, ७अ, ९ब, १६ब🔹 शेगाव — प्रभाग ४अ, ४ब🔹 जळगाव जामोद — प्रभाग ६अ, ६ब, ७ब देऊळगाव राजा नगराध्यक्षपदाचे प्रकरण काय?निर्मला बाबुराव खैरनार यांनी दाखल केलेला अर्जसूचकांच्या प्रभाग क्रमांकाऐवजी चुकून वार्ड क्रमांक लिहिल्याने अर्ज रद्दत्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केलेपरंतु न्यायालयाने अपील उशिरा दाखल झाल्यामुळे फेटाळलेहेच प्रकरण आयोगाकडे नोंदवले गेले आहेअॅड. आशिष शिंगणे यांनी स्पष्ट केले की,“जर आयोगाने देऊळगाव राजा नगराध्यक्ष निवडणूक स्थगित केली नाही, तर आम्ही १ डिसेंबरला उच्च न्यायालयात अपील करू.” आयोगाचा निर्णय लवकरचआयोग आज–उद्या निर्णय देणार असून दोन्ही शक्यता—1️⃣ निवडणूक तसेच ठेवणे2️⃣ निवडणूक एक आठवडा पुढे ढकलून नवीन नामांकन घेणेजर निवडणूक नव्याने घेतली गेली तर :नामांकन : ४ डिसेंबरमागे घेणे : १० डिसेंबरमतदान : २० डिसेंबरमतमोजणी : २१ डिसेंबर
BREAKING:देऊळगाव राजा, खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोदच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाचा ब्रेक?













