भरोसा (ता. – चिखली ) येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
गावात शरद जोशी यांच्या विचारांचा प्रभाव सुरुवातीपासूनच जाणवत असून त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याची परंपरा म्हणून दरवर्षी जयंती व पुण्यतिथी उत्साहात साजरी केली जाते.
१२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता महादेव मंदिराच्या सभामंडपात महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रतिमापूजन करून पुष्प अर्पण करत आपला आदरभाव व्यक्त केला.
स्मृतिपूजन कार्यक्रमात एकनाथ पाटील, विक्रम आज्या, राजू शेटे, एकनाथ दगडू थुट्टे, एकनाथ कडुबा, सुखदेव सादुबा, विठेबा गव्हते, सुभाष चेके, विठ्ठल पर्वता, नामदेव थुट्टे, नामदेव सदाशिव थुट्टे, नरहरी थुट्टे, एकनाथ शेटे, राजू पाटील, मधुकर पाटील, गजानन थुट्टे, पांडुरंग महादू, संजय थुट्टे, सुखदेव तरमळे, संदीप थुट्टे, वैभव शेटे, अंकुश सुरेश थुट्टे, शंकर पैठणे, दगडू वाघमारे तसेच सौ. सुमनबाई थुट्टे यांनी पूजन करून श्रद्धांजली वाहिली.
या वेळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून शरद जोशी यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.













