देऊळगाव साकर्शात भरदिवसा हात साफ; चोरट्यांनी घरच फोडलं…!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव साकर्शा गावात १९ जानेवारीला दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मोठा हात साफ केल्याची खळबळजनक घटना घडली. खिडकीतून आत शिरून चोरट्यांनी पेटीचा कोंडा वाकवला आणि सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास चार लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

ही घरफोडी सुरेश नवत्रे यांच्या घरात झाली. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सफाईदारपणे चोरी केली. चोरीची बाब उघडकीस येताच गावात एकच चर्चा सुरू झाली असून, भरदिवसा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची खबर मिळताच जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, चोरट्यांचा लवकरच छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!