चिखलीत अवैध वृक्षतोडींना वन अधिकाऱ्यांचा पाठींबा? मनसेची कडक कारवाईची मागणी!

avaidh vrukshatod chikhli

चिखली (कैलास आंधळेबुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. ही कापलेली लाकडे शहरातील खबुतरे ले-आऊट, ग्रामीण रुग्णालय परिसर आणि सैलानी नगर या भागांमध्ये साठवली जातात. लाकडे वाळल्यानंतर ती अन्यत्र हलवली जातात आणि त्याच ठिकाणी नव्याने लाकूड आणून साठवले जाते. या गैरप्रकाराकडे वन विभागाकडून मुद्दामहून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे.

या प्रकरणी स्थानिक वनपाल खान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही पाहणी किंवा पंचनामा केला नसल्याचे आढळले. विशेष बाब म्हणजे, लाकूड साठवलेल्या जागेवरून ती अचानक हटवण्यात आली, त्यामुळे वनपालांनीच लाकूडतोड करणाऱ्यांना खबर दिल्याचा संशय मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात मनसेने २३ मे २०२५ रोजी बुलडाणा येथील उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

धक्कादायक! चुलत काकाने अल्पवयीन पुतणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवले; धाड पोलिसांची त्वरित कारवाई

त्यानंतर वन कर्मचारी गजानन शिंदे यांनी केवळ औपचारिक भेट देऊन पाहणी केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना लाकूड साठ्याच्या जागा दाखवत कारवाईची मागणी केली, परंतु शिंदे यांनीही केवळ खानापुरती पाहणी करून हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या मनसेने आज, २ जून २०२५ रोजी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात निष्क्रियता दाखवणारे वनपाल खान आणि गजानन शिंदे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही लावून धरली आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार आणि चिखली शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे वन विभाग आणि प्रशासनावर दबाव वाढला आहे. आता या अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!