मुलीचे पूर्ण वय नसताना घरचे लग्न करून देत होते; अचानक  मग काय……!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे अल्पवयीन मुलीचे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले असून, देऊळगाव राजा पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती तसेच विवाहास सहकार्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २५ एप्रिल २०२५ रोजी टाकरखेड भागीले येथे सुमित अमोल घेवंदे याच्याशी लावण्यात आला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संबंधितांनी जाणीवपूर्वक विवाह लावल्याचा आरोप आहे.

ही बाब ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उघडकीस आली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण चिखली पोलिस ठाण्याकडून वर्ग करून देऊळगाव राजा येथे नोंदवण्यात आले आहे.

प्रकरणी मुलीचे पालक तसेच अमोल घेवंदे, संगीता अमोल घेवंदे आणि सुमित अमोल घेवंदे (रा. वाघत-वाघुळ, ता. सिंदखेडराजा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बालविवाह रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!