
मेहकर (सतीश काळे,बुलडाणा कव्हरेज न्युज): देवदर्शन करून गावी परतणाऱ्या कुटुंबाची कार पाठीमागून ट्रकवर धडकली. या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. यापैकी तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
शुक्रवारी ११ एप्रिल रोजी पहाटे मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला.वाशीम येथील रहिवासी असलेले चंदनशीव कुटुंब आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुण्याकडून कारने (क्रमांकः एमएच ११ – सीक्यू ८५६६) गावी परतत होते. या दरम्यान मेहकरजवळ समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चेनेज २६८ येथे चालक शिवाजी इडोळे (रा. वाशीम) याला डुलकी लागल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन समोरच्या ट्रकला (क्रमांक: आरजे २९ – जीबी २८२०) पाठीमागून धडकली.
Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…
या भीषण अपघातात कारमधील रतन जिजेबा चंदनशीव (वय ७०) आणि गोपाळ रतन चंदनशीव (वय ३२) या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात पूजा रतन चंदनशीव (वय २९), राणी गोपाळ चंदनशिव (वय ३१),अर्चना रतन चंदनशिव (वय ६८) आणि योगेश गोपाळ चंदनशीव व चालक शिवाजी इडोळे हे पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच क्विक रिस्पॉन्स टीम, स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली या भीषण अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन महिलांची प्रकृती गंभीर..
अपघातामधील जखमींना उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले जखमी पैकी पूजा चंदनशिव राणी चंदनशिव आणि अर्चना चंदनशिव यांची प्रकृती चिंताजनक असलेली त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले बेकार पोलिसांनी कार ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेतल्या असून पुढील तपास केला जात आहे.