जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कोनड येथे भव्य उद्घाटन…

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे भव्य उद्घाटन दत्तक गाव कोनड खुर्द येथे पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे होते तर उद्घाटक म्हणून विवेकानंद विद्यालयाचे सचिव. एस टी गोरे सर होते.विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले अंढेरा येथील ठाणेदार रुपेश शक्करगे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोनड गावचे सरपंच संजय वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ वानखेडे पोलिस पाटील रंगनाथ जावळे. शिवसेना नेते पंजाबराव जावळे , दादाराव सुरडकर तुळशीदास जावळे, सुगदेव जावळे ,प्रताप वानखेडे ,जीवन जावळे ,शंकर जावळे भागवत जावळे. रामदास झाल्टे .गजानन जावळे. प्राचार्य श्री एच जी घुबे सर मुख्याध्यापक श्री अंभोरे सर रमेश जावळे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

. जाहिरात….👆

यावेळी उद्घाटक म्हणून लाभलेले एस टी गोरे सर यांनी राष्ट्रीय योजना शिबिराच्या माध्यमातूनच आदर्श विद्यार्थी आणि सुजान नागरिक बनू शकतो व गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते असे मत व्यक्त करत असताना त्यांनी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधींच्या जीवन चरित्रा वर प्रकाश टाकला .त्यानंतर ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी विद्यार्थी दशेतच समाजाचा आणि देशाच्या विकासासाच्या दृष्टिकोनातून अशा शिबिराची गरज असते .असे मत व्यक्त करून आपण कसे घडलो याचे उदाहरणे दिले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री शेनफडराव घुबे यांनी आपले मत मांडताना या शिबारच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा स्वावलंबन आत्मिक व आध्यात्मिक जागृती चे माध्यम म्हणजे रा .से .यो शिबिर आहे आणि जानकीदेवी विद्यालय हे विद्यार्थ्यासाठी एक सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन मिसाळ यांनी केले तर कार्यक्रमांची संपूर्ण रूपरेषा प्रा. उद्धव घुबे यांनी मांडून मान्यवरांचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमांचे सूत्रसंचलन कु. अनुराधा दरेकर आणि खुशी जाट हिने केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डी व्हि. सर प्रा.अमोल डुकरे प्रा.चव्हाण सर प्रा कऱ्हाडे . प्रा.संतोष मिसाळ पूनम मॅडम पडोळे मॅडम यांनी मेहनत घेतली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!