बिबट्या आला रे आला; येवता शिवारात आला… हल्ला करून गेला…!

येवता (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील येवता गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. येथील दिगंबर गोविंद घेवंदे हे शेतकरी आपल्या शेतात कामासाठी गेले असता, अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

गावालगतच्या शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून, वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नागरिकांनी सावध राहावे आणि एकट्याने शेतात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!