भरधाव काळी-पिवळीची जोरदार धडक; करतवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उदयनगर परिसरात, गोविंदा शेळके यांच्या शेताजवळील पेठ चढावर घडला.

सतीश सपकाळ हे मोटारसायकल (MH28 Z 6054) ने चिखलीहून आपल्या गावी करतवाडी येथे जात होते. यावेळी अमडापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या काळी-पिवळी वाहनाने (MH28 H 3379) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!