अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांनी घर फोडून तब्बल २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी विष्णू कारभारी काकड यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्या दिवशी विष्णू काकड बुलडाण्याला गेले असताना, गावातील राम राठोड यांनी फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
घरी परतल्यावर घराच्या मागच्या दारातून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे लक्षात आले.घरातील १ लाख ३० हजार रुपये रोख, तसेच सोन्या-चांदीचे दागिने, गॅस सिलिंडर व भांडी असा एकूण २ लाख ४३ हजारांचा माल चोरीस गेल्याचे दिसून आले.तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी ५ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वात हेडकॉन्स्टेबल रावसाहेब मुंढे तपास करत आहेत.














