देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील किन्ही पवार शेतशिवारात विहिरीच्या मालकी हक्काच्या वादातून एका महिलेस तसेच तिच्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती….तक्रारकर्त्या अहिल्याबाई भीमराव खरात या आपल्या मुलासह गहू पेरणीसाठी पाणी सोडण्याकरिता सामायिक विहिरीवर मोटार बसवण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा अविनाश गौतम खरात व पवन गौतम खरात यांनी ही विहीर आमची असल्याचे सांगत त्यांना अडवले.यानंतर दोघांनीही अहिल्याबाईंना अयोग्य शब्दांत शिवीगाळ केली आणि केस पकडून जमिनीवर फेकले. यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. पुढे आरोपींनी डोक्यावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, त्यांचा मुलगा अविनाश यालाही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.तसेच, “पुन्हा विहिरीवर आलात तर जिवे मारू” अशी धमकीही आरोपींनी दिली.पुढील कार्यवाही….ही तक्रार १ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात दाखल झाली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करत आहेत.












