समोरून येणाऱ्या टिप्परला वाचवताना कार विजेच्या खांबावर धडकली; वर्षा रसाळ ठार, तिघे जखमी…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – खामगाव-चिखली रोडवर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. समोरून भरधाव येणाऱ्या एका टिप्परला वाचवण्यासाठी कारचालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. पण नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जोरात आदळली.या अपघातात कारमधील वर्षा संतोष रसाळ या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अनंता रामकृष्ण रसाळ (४७), त्यांची पत्नी सपना रसाळ (४६) आणि आई लता रसाळ (७०) जखमी झाले आहेत. सर्व जखमींना ग्रामस्थांनी तत्काळ खामगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.ही कार एमएच ३० एझेड ७२२७ अशी असून, रसाळ कुटुंब खामगाववरून उदयनगरकडे जात होते. गारडगाव शिवारातील सी. सी. देशमुख यांच्या शेताजवळ हा अपघात घडला.घटनेनंतर शुभम गजानन रसाळ यांच्या तक्रारीवरून अज्ञात टिप्परचालकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहे.का. भगवान काळबागे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!