चिखली नगराध्यक्ष पदावर भाजप–काँग्रेस आमनेसामने! शेवटच्या क्षणी कोणाच्या गळ्यात माळ? राजकीय राजधानीत थरार चिघळला..!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि काँग्रेस — दोन्ही पक्षांत मोठा गोंधळ आणि उत्सुकता दिसत आहे.

भाजपकडून दोन्ही प्रबळ दावेदार असलेले सौ संध्या ताई कोठारी आणि पंडित दादा देशमुख हे स्वतःचा जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, या दोघांपैकी शेवटी भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालणार? यावरच पक्षातील समीकरणे अडकली आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसकडून कुणाल बोंद्रे आणि डॉ. निलेश गावंडे हे दोघेही नगराध्यक्षपदासाठी तयारीत आहेत आणि मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे.

सध्या प्रश्न असा आहे की,भाजप काँग्रेसचा उमेदवार पाहतेय की काँग्रेस भाजपचा?
कारण चिखली तालुका हा बुलडाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी मानला जातो. त्यामुळे दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत सावध पवित्रा घेत आहेत.

शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणीच स्पष्ट होणार,
कोण उमेदवारी घेतो, कोण शांत बसतो आणि कोण बंडाचा झेंडा उभारतं?

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!