शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)
कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता मुलीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिंत्रव (ता. शेगाव) येथील कैलास ज्ञानदेव हिंगणे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांची मुलगी वेदीका कैलास हिंगणे (वय १६ वर्षे) ही ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र, ती सायंकाळी कॉलेजमधून घरी परत आली नाही.
कुटुंबीयांनी तिचा कॉलेज परिसर, बसस्थानक, मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे शोध घेतला, पण ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे ती कुठेतरी निघून गेल्याची शक्यता वडिलांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.
वेदीकाने घटनेच्या दिवशी गुलाबी रंगाची फुलांची डिझाईन असलेली पंजाबी कुर्ती, सलवार आणि गुलाबी ओढणी असा पोशाख परिधान केला होता.
या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १३७ (२) भा. न्या. स. २०२३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकाँ अरुण मेटांगे करीत आहेत.
कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
Updated On: November 8, 2025 10:33 am












