साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)हिवरा गडलींग तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा च्या लोकनियुक्त सरपंच सौ. पुनम अनंता खरात ग्रामपंचायत हिवरा गडलिंग या ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 ने आज पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
सौ पुनम अनंता खरात ह्या हिवरा गडलिंग नगरीच्या लोकनियुक्त सरपंच बनल्या. अतिशय कमी कालावधीमध्ये सरांच्या मार्गदर्शनातून महिलांचा मान सन्मान या योजनेअंतर्गत महिलांच्या हस्ते ध्वजारोहाण , गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी, नळ योजनेची पाईपलाईन, गावातील उत्कृष्ट दर्जाची रस्ते, शोषखड्डे, मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे, गावातील लाईन व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा, गावातील स्वच्छतेचे व्यवस्थापन, यासारखी अशी अनेक सामाजिक,शैक्षणिक विकासाची कामे कमी कालावधीत पार पाडली.
तसेच हिवरा गडलिंग येथे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते, व कामकाज अवघ्या काही दिवसात पूर्ण केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांनी हिवरा गडलिंग नगरीच्या लोकनियुक्त सरपंच सौ पुनम अनंता खरात यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे त्यांची गावातूनच नव्हे तर तालुक्यातून सुद्धा अभिनंदनचा वर्षाव होत आहे













