शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यावर दिवसाढवळ्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्रीचा प्रकार उघडकीस; वन विभागाची दबंग कारवाई

शेळगाव-आटोळ (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यालगतच्या शेतात दिवसाढवळ्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने तातडीने धाड टाकून एक जिवंत काळवीट आणि मोठ्या प्रमाणात काळविटाचे मांस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Bhajani mandal anudan yojana: महाराष्ट्रात भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान, अर्ज कसा करावा? पूर्ण मार्गदर्शन

गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि. २४ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता अंचरवाडी बिटचे वनरक्षक गजानन पोटे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाड टाकली. तपासणीदरम्यान, एक काळवीट बांधलेल्या अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या काळविटाची हत्या करून त्याचे मांस झाडाला टांगून विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. यावेळी वन विभागाने मांस कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे, काळविटाची कातडी, पाय, दोन किलोचा वजनकाटा आणि एक दुचाकी (क्र. MH 28 BU 4923) असा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत वनपाल मोहसीन खान, वनरक्षक झोटे आणि वनरक्षक गजानन पोटे यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. शेतात बांधलेले काळवीट आणि जप्त केलेले मांस वन विभागाच्या ताब्यात घेऊन जमा करण्यात आले.

HDFC Bank Job Vacancy in Maharashtra 2025: छत्रपती संभाजीनगरमध्ये वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज सुरू, पगार आणि डिटेल्स जाणून घ्या!

वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार आणि मांस विक्री हा गंभीर गुन्हा असून, याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

मागील आठवड्यात अमोना ते देऊळगाव घुबे रस्त्यावर असाच एक प्रकार घडला होता. काळविटाचे मांस विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्करांना अमोना येथील दुचाकीस्वार तरुणांनी हटकले असता, तस्करांनी त्या तरुणावर चाकूहल्ला केला होता. आठवड्याभरात घडलेली ही दुसरी घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यावर दिवसाढवळ्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्रीचा प्रकार उघडकीस; वन विभागाची दबंग कारवाई”

Leave a Comment

WhatsApp Join Group!