बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजा करत आणलेली “लाडकी बहिण” योजना आता अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्य सरकारने महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करून लोकप्रियता मिळवली, पण आता अटी-शर्तींच्या अडथळ्यांमुळे हजारो महिलांना योजना बंद होण्याचा फटका बसला आहे.जिल्ह्यात जून महिन्यातच २२ हजारांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आले, तर एकूण अपात्र लाभार्थ्यांची संख्या २४ हजार ८४ पर्यंत पोहोचली आहे.
अटी-शर्तींचा फटका…
सरकारकडून पात्रतेची नव्याने पडताळणी सुरू झाल्यानंतर महिलांना खालील कारणांमुळे अपात्र ठरवण्यात येत आहे:घरात चारचाकी वाहन असणे६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणेनिराधार योजना अथवा इतर सरकारी योजना सुरू असणेएकाच रेशन कार्डावर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असणेसरकारी/खाजगी नोकरी अथवा कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असणेनवीन अर्ज स्वीकारले जात नाहीतअनेक तरुणी, ज्यांनी नुकतीच वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत, त्या योजनेत अर्ज करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, सध्या शासनाकडून नवीन नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे या मुलींना “आम्ही लाडक्या बहिणी नाही का?” असा प्रश्न पडला आहे.
राजकीय फायदे – आता नाराजी?”लाडकी बहिण” ही योजना सुरु करताना लाखो महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करून सरकारने मोठा राजकीय संदेश दिला होता. यामुळेच निवडणुकीत युतीला फायदा झाला, असे बोलले जाते. मात्र आता हजारो महिलांना योजनेतून बाहेर काढल्यामुळे, सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
1 thought on ““लाडकी बहिण योजना”तून हजारो महिला अपात्र; जिल्ह्यात २२ हजार महिलांना फटका….”