साखरखेर्डा (सचिन खंडारे : बुलडाणा कव्हरेज न्युज) – राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही तो बाहेरच्या राज्यांतून आणून विक्री करण्याचे प्रकार थांबत नाहीत. अशीच एक कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने साखरखेर्डा येथे केली असून, तब्बल 2 लाख 95 हजार 500 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 16 जुलै रोजी साखरखेर्डा येथील एका किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. झाडाझडती दरम्यान दुकानातून खालीलप्रमाणे गुटख्याचा साठा आढळून आला:
राज निवास पान मसाला (50 पाऊचचे 590 पॅकेट) – 1,18,000 रुपये किमतीचा
जपानी जनता (30 पाऊचचे 590 पॅकेट)
वाह पान मसाला (30 पाऊचचे 256 पॅकेट)
डब्ल्यू च्चुवींग तंबाखू (30 पाऊचचे 256 पॅकेट)
केसरयुक्त गुटखा – 810 पॅकेट
एकूण साठा 2.95 लाख रुपयांचा असून, तो जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार कृष्णा संजय भावसार (वय 27, रा. साखरखेर्डा) व राजू भाकडे (रा. चिखली) या दोघांविरोधात विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(d), 27(3)(c), 3(1)(22)(iv), 59 तसेच भारतीय दंड विधान कलम 223, 274, 275, 123 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सानप हे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.













