लम्पी आजार पुन्हा चिखली तालुक्यात सक्रिय; चिखली तालुक्यातील काही भागात बैल आणि गाई लॅम्पी, गायीवर उपचार सुरू…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
गेल्या वर्षी अनेक गुरांचे बळी घेणारा लम्पी त्वचारोग पुन्हा चिखली तालुक्यात शिरला आहे. चिखली तालुक्यातील एका गावात आज रोजी रोजी एक जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळली.एका गायीवर सध्या उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी लम्पीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने सुमारे ६५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. यंदाही लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पशुपालकांसाठी सतर्कतेचे आवाहन:

पशुसंवर्धन विभागाने जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच रोग पसरू नये म्हणून जनावरांचे योग्य विलगीकरण, स्वच्छता आणि लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

लम्पीची प्रमुख लक्षणे:

डोळे व नाकातून पाणी येणे

लसिका ग्रंथींची सूज

दूध उत्पादनात घट

चारा व पाणी पिण्याची इच्छा कमी होणे

तोंड, डोळे व नाकाभोवती व्रण

पायावर सूज येऊन लंगडणे

ही कोणतीही लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!