२२ वर्षांची युवती गुणपत्रिका आणायला गेली परत आलीच नाही; बोराखेडी पोलिसांत हरवल्याची नोंद….

महाराष्ट्रातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल; नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी जाणून घ्या नवं टाइमटेबल

मौताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मलकापूर येथील महाविद्यालयात गुणपत्रिका आणण्यासाठी गेलेली एक २२ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली असून, ११ जुलै रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.तळणी गावातील दीपक विश्वनाथ नाफडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी समीक्षा नाफडे (वय २२) हिला मलकापूरच्या महाविद्यालयातून प्रथम वर्षाची गुणपत्रिका आणण्यासाठी पाठवण्यात आले होते.

सकाळी शेलापूर बसस्टॉपवर तिला सोडण्यात आले. मात्र संध्याकाळी पाच वाजता जेव्हा वडील तिला परत आणण्यासाठी बसस्टॉपवर गेले, तेव्हा ती तिथे पोहोचलीच नव्हती.समीक्षा नाफडे ही पाच फूट दोन इंच उंच, निमगोऱ्या रंगाची असून, ती निघाल्यावेळी जिन्स पॅन्ट आणि टॉप घातलेला होता. तिचा कुठलाही संपर्क न आल्याने तिच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सुरडकर व पोलिस कॉन्स्टेबल संदीप ढोले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!