येळगाव आश्रमशाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा; जेवणात कढी-भाताचे सेवन केल्यावर प्रकृती बिघडली

येळगाव आश्रमशाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा; जेवणात कढी-भाताचे सेवन केल्यावर प्रकृती बिघडली

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (९ जुलै) रात्री शाळेच्या भोजनालयात विद्यार्थिनींना कढी-भाताचे जेवण देण्यात आले. जेवण केल्यानंतर रात्री उशिरा काही विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे शाळेतील प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

तातडीने या सर्व १३ विद्यार्थिनींना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच प्रशासनाने तपास सुरू केला असून जेवणातील अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “येळगाव आश्रमशाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा; जेवणात कढी-भाताचे सेवन केल्यावर प्रकृती बिघडली”

Leave a Comment

WhatsApp Join Group!