“मी पुन्हा येईल” चा मेसेज खोटा; पुणे बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; ३० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका २२ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती, मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिस तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, आरोपी हा कुरिअर बॉय नसून तरुणीचा जुना मित्र आहे. तसेच, तरुणीने तक्रारीत बलात्काराचा आरोप केला असला, तरी तिने काही बाबी पोलिसांपासून लपवल्याचे उघड झाले आहे.

“मी पुन्हा येईल” असा मेसेज लिहून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; डिलीवरी बॉय बनून घरात घुसणाऱ्या संशयिताला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने डिलीवरी बॉय असल्याचा बनाव करून तरुणीच्या घरात प्रवेश केला होता. त्याने बँकेसंदर्भातील लिफाफा देण्याच्या बहाण्याने तिला बोलण्यात गुंतवले आणि स्वाक्षरीसाठी पेन मागितले. तरुणी पेन आणण्यासाठी मागे वळली असता, संशयिताने घरात प्रवेश केला आणि दार बंद केले. तक्रारीनुसार, यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि तिच्या मोबाइलवर एक सेल्फी घेतली. या सेल्फीखाली “मी घडलेल्या घटनेचे फोटो घेतले आहेत, तक्रार केली तर त्या सोशल मीडियावर टाकेन” आणि “मी पुन्हा येईल” असा धमकीचा संदेश लिहिल्याचा दावा तरुणीने केला होता.

देऊळगाव राजात दु:खद घटना: दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू

मात्र, पोलिस तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. संशयित आणि तरुणी गेल्या एका वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचा परिचय एका सामाजिक मेळाव्यात झाला होता आणि ते फोन व सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्कात होते. संशयिताने तरुणीला अनेकदा फूड डिलीवरीद्वारे खाद्यपदार्थ पाठवले होते. घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत आला आणि पावणेनऊ वाजता बाहेर पडला, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना तांत्रिक तपासात असे आढळले की, तरुणीने स्वतःच त्या सेल्फीला एका ॲपद्वारे एडिट केले होते आणि त्याखाली धमकीचा संदेश स्वतःच लिहिला होता. संशयितानेही पोलिसांना ही कबुली दिली आहे.

बायकोच्या डोक्यात दगड टाकून बायकोची हत्या करणाऱ्याला नवऱ्याला आजीवन कारावास…!

तरुणीने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला असला, तरी संशयिताने असा कोणताही बेशुद्ध करणारा स्प्रे वापरला नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच, संशयिताने असा दावा केला आहे की, तो तरुणीच्या सांगण्यावरूनच तिच्या घरी गेला होता. दोघांमधील व्हॉट्सॲप संभाषणातूनही काही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि सोसायटीतील ४४ रहिवाशांचे जबाब नोंदवले. यातून असे स्पष्ट झाले की, संशयित फक्त तरुणीच्या घरीच गेला होता.

काँग्रेस कावेबाज, त्यांचे शेतकरी प्रेम बेगडी: आ. सौ. श्वेता महाले यांनी विधानसभेत उघड केले महाविकास आघाडीचे शेतकरी विरोधी धोरण

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात सध्या कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. तरुणीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू आहे आणि तिच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल आहे. मात्र, तरुणीने संशयिताला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले, ज्यामुळे तिच्या तक्रारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!