मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक सर्कलमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चार पक्षांची चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे! मागील २०१२ च्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसने अनपेक्षित विजय मिळवून भाजपचा बालेकिल्ला खिळखिळा केला होता.तर २०१७ च्या निवडणुकीतही कॉग्रेसने विजय मिळवला होता त्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट टक्कर झाली होती. भाजप मात्र चक्क चौथ्या क्रमांकावर फेकली गेली होती.
महाविकास आघाडीचे गोटात हालचाली सुरू…
या वेळी आरक्षण सोडत कायम राहिल्यास, महिला आरक्षणाच्या ऐवजी पुरुष खुलं झाल्यास, प्रत्येक पक्षात तिकीटासाठी चढाओढ वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत स्पर्धा अधिकच तापली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पडघान यांनी मैदानात उडी घेतली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ हे मागील अनेक वर्षांपासून मेरा बुद्रुक आणि मेरा खुर्द सर्कलमध्ये सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे आघाडीने कोणाला तिकीट द्यायचं, यावरच संपूर्ण लढतीचं समीकरण अवलंबून राहील.
महायुतीकडून भाजप-शिंदे गटाची तयारी सुरू..
दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीतही जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचे डॉ. कृष्णकुमार सपकाळ गेल्या सात वर्षांपासून सातत्याने मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी कोलरा पंचायत समिती सर्कलच्या विद्यमान सदस्य होत्या . सामाजिक क्षेत्रातील काम त्यांना जनतेत लोकप्रिय करत आहे. त्यांच्यासोबतच शिवसेना (शिंदे गट) चे रोहित खेडेकर हे सुद्धा मैदानात झोकून देत असल्याने महायुतीचा उमेदवार कोण, हे महत्त्वाचं ठरणार आहे.तिकीट न मिळाल्यास बंडखोरी संभवतेमहाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये तिकीटासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारीचे चित्र निर्माण होऊ शकते. अनेक कार्यकर्ते पक्षांतराची शक्यता गावी व्यक्त करत आहेत.
एकंदरीत लढतीचं चित्र
महाविकास आघाडीकडून: अशोकराव पडघान (काँग्रेस) आणि गजानन वायाळ (राष्ट्रवादी शरद गट)
महायुतीकडून: डॉ. कृष्णकुमार सपकाळ (भाजप) आणि रोहित खेडेकर (शिवसेना शिंदे गट)सध्या गावपातळीवर चर्चा अशी आहे की, गजानन वायाळ यांचा जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि समाजातील सक्रियता पाहता त्यांना उमेदवारी देण्याच्या शक्यता अधिक आहेत. दुसरीकडे डॉ. सपकाळ यांच्या लोकाभिमुख कामामुळे भाजपाच पारड देखील हलक नाही.
शेवटी तिकीट कुणाला?
पक्षांतर्गत समीकरणं, स्थानिक सामाजिक समीकरणं आणि जनाधार यावर अंतिम उमेदवारी ठरणार आहे. मात्र हे निश्चित की, या सर्कलमध्ये होणारी लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी इतकीच नाही, तर घराणं विरुद्ध कार्यकर्ते, जनसंपर्क विरुद्ध पक्षाधार अशीही ठरणार आहे.अजून आरक्षण सोडत झाली नाही त्यामुळे जुन्या अंदाज वरून कायम ठेवण्यात राहिल्यास तर अस होऊ शकते?शेवटी राजकारण आहे काय होईल हे सांगता येणार नाही!













