खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज):भालेगाव बाजार शिवारात शेतात गव्हाचे कुटार टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.
ही घटना २ जून रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.सुलेमान शहा रहमतुल्ला शहा (वय ५५) यांनी आपल्या शेतात गव्हाचे कुटार टाकले होते. यावरून इसाक शहा (वय ५०) याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर, उस्मान शहा याने काठीने मारहाण केली आणि रजियाबी उस्मान शहा हिने केस ओढून आणि चेहऱ्यावर नखांनी ओरबाडून शारीरिक व मानसिक छळ केला.
या प्रकरणी सुलेमान शहा यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी इसाक शहा, उस्मान शहा आणि रजियाबी उस्मान शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.