रविकांत तुपकर यांचा वाढदिवशी शेतकरी प्रश्नांवर उपोषण…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचा आज, १३ मे रोजी वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवस साजरा न करता त्यांनी शेतकरी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण बुलढाण्यातील चिखली रोडवरील त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे.सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतकरी त्यांच्या समर्थनार्थ तुपकर यांच्या निवासस्थानी जमले आहेत.

शहीद भगतसिंग आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.शेतकऱ्यांशी संवाद साधताना रविकांत तुपकर म्हणाले की, “राज्यात दररोज सरासरी १० शेतकरी आत्महत्या करत आहेत. सोयाबीन व कापसाला योग्य हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्नही प्रलंबित आहे.

या गंभीर समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच नेहमीप्रमाणे शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे.””शेतकरी अडचणीत असताना आपला वाढदिवस साजरा करणे उचित वाटले नाही. त्यामुळे उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

आज सकाळ पासून शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांनी त्यांना पुष्प गुच्छ न देता आज त्यांना शेतकऱ्याचा हातातील रुमान आणि आसूड देऊन त्यांचा स्वागत केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!