बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे उद्या, १२ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिखली तालुक्यातील इसरूळ गावात सुरू असलेल्या संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यास ते भेट देणार असून, त्यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात येणार आहे.चिखली तालुक्यातील इसरूळ येथे हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या पुढाकारातून संत चोखोबाराय यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
१० मेपासून सुरू झालेला पुण्यतिथी सोहळा १८ मेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत सकाळी आणि रात्रीच्या सत्रांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या हरीकिर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शिवचरित्र कथा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हरीकिर्तन सप्ताहात प्रथमच शिवचरित्र कथा समाविष्ट करण्यात आली आहे.