EXCLUSIVE: दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार तयारीत…

EXCLUSIVE: दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार तयारीत...

सिंदखेडराजा (ऋषि भोपळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुलडाणा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सिंदखेडराजा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजी व माजी आमदार, पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी चुरस वाढत असून, आजी-माजी आमदार, नवे उमेदवार आणि पक्ष कार्यकर्ते सगळेच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार, यात शंका नाही.

ऐकावे ते नवलच! ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा, ठरत आहे गुणवत्तेचं प्रतीक

ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि म्हणूनच अनेक नवे व जुने चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सिद्ध झाले आहेत. कोणी जनसंपर्क दौरे करत आहे, तर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क ठेवत आहे.

माजी आमदार शिंगणे आणि कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज…

२८ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा येथे कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना ‘तयारीला लागा’ असा कानमंत्र दिला. डॉ. शिंगणे हे या मतदारसंघाचे माजी आमदार असून, त्यांची संघटना रचनेवर खास पकड आहे.

अनुराधा अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रकरणात तीन महिन्यांचा अन्याय दोन तासात मिटला; न्याय व्यवस्थेकडून सत्ताधाऱ्यांना चपराक!

आमदार मनोज कायंदे यांचीही मोर्चेबांधणी सुरू…

दुसरीकडे, सत्ताधारी आमदार मनोज कायंदे यांनीही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या आमदार कायंदे हे नव्या दमाचे आमदार असून, त्यामुळे ते हळूहळू मतदारसंघात जनसंपर्क वाढवत आहेत. मागील काही दिवसांपासून ते देऊळगाव घुबे, अमोना, देऊळगाव राजा, देऊळगाव माही यासह इतर गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत. “तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी आमदार तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास ते मतदारांना देत आहेत.

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर निवडणूक राजकारणात शांत… पण विरोधकांना धक्का देण्याची ताकद कायम!

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर सध्या राजकारणात फारसे सक्रिय नसले, तरी त्यांचा जनसंपर्क आणि गड मानले जाणारे समर्थकांचे नेटवर्क अद्यापही मजबूत आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्यास विरोधकांसाठी धोका निर्माण करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

डॉ. खेडेकर एकदा आमदार म्हणून निवडून आले असून, त्यानंतर दोन वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीत कमी मतांनी पराभव पत्करला होता.

नुकत्याच काळात ते फारसे सक्रिय नसले, तरी “डॉ. खेडेकर म्हणजे अचानक मैदानात येऊन बाजी मारणारा नेता” अशी प्रतिमा आजही जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये टिकून आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते कधीही जोरदार पुनरागमन करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पहिल्यांदाच आव्हान आमदार मनोज कायंदे यांच्यासमोर…

आमदार कायंदे यांच्यासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक पहिल्यांदाच आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर एक वेगळीच जबाबदारी आहे. जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे केवळ राजकीय ताकद नाही, तर शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचे तंत्रही महत्त्वाचे आहे, हे जाणून तेही तयारीला लागले आहेत.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “EXCLUSIVE: दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार तयारीत…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!