मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) राज्यात जशी जशी थंडी वाढत चालली आहे तशी तशी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे. नगर पालिकेचा किंवा नगर परिषद कुठ युती कुठ स्वतंत्र तर कुठ जशी जशी तड जोड करून आता नगर परिषद व नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. या निवडणुका संपताच सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींकडे वळले आहे.दरम्यान, महसूल विभागात मोठे बदल झाले असून राज्यातील तब्बल ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी पुढील ८ ते १० दिवसांत त्यांच्या नव्या ठिकाणी रुजू होणार आहेत. विभागीय आयुक्तांकडून या प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३१ पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल ५ डिसेंबरपासून कधीही वाजू शकतो.राज्यातील प्रलंबित निवडणुकांना आता गती येण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, जिल्हा परिषद निवडणुकीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
ZP ELECTION जिल्हा परिषद निवडणुकांची उलटी गणती सुरू! नोव्हेंबर अखेर किंवा ५ डिसेंबरपासून बिगुल वाजण्याची शक्यता?














