सिंदखेडराजा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा नेते कोण कोठून रिंगणात उतरणार, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे तरुण चेहरे आता पुढे सरसावत आहेत. विशेषतः तीन प्रमुख युवा नेत्यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषी जाधव हे याआधी देऊळगाव माळी सर्कलमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मोजक्या मतांमुळे त्यांचा पराभव झाला आणि विजय हुलकावणी देऊन गेला. मात्र त्यांचा आत्मविश्वास आजही कायम असून पुढील निवडणुकीसाठी ते सज्ज असल्याचे बोलले जात आहे आणी त्यासाठी शिंदेगटा कडून जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते आपली ओळख तयार करण्यासाठी पायाला भवरा बांधून ऋषी जाधव हे जिल्हाभर फिरत आहे.
दुसरे नाव म्हणजे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पुत्र श्रीनिवास खेडेकर. समाजात सतत उपस्थित राहून जनतेच्या अडचणी समजून घेण्याची त्यांची कार्यशैली उल्लेखनीय ठरली आहे. अनेकदा मदतीसाठी अगोदर धावून जाणारे श्रीनिवास हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!
तर, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती योगेश जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीची. सिंदखेडराजा तालुक्यातील गावागावात “दादा तुम्ही आमच्या सर्कलमधून लढा” अशी भावनिक साद मुलांपासून वृद्धांपर्यंत दिली जात आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी समाजातील विविध गरजूंसाठी पाणीटँकर, औषधोपचार, आश्रमांना मदत, अशा उपक्रमांतून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांनी कुठून उमेदवारी लढावी, यावर जनतेचाच दबाव असल्याचे चित्र आहे.
आता प्रश्न असा आहे की, हे तीनही युवा नेते आपल्या सर्कलमधून थेट निवडणूक रिंगणात उतरणार की काही रणनीतीनुसार थांबणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे डोळे लागले आहेत…













