“योगेश दादा, आमच्या सर्कलमधून लढा!” – सिंदखेडराजा तालुक्यातील जनतेची आग्रहाची मागणी

"योगेश दादा, आमच्या सर्कलमधून लढा!" – सिंदखेडराजा तालुक्यातील जनतेची आग्रहाची मागणी

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “आमच्या प्रत्येक संकटात धावून येणारा माणूस आता आमचा प्रतिनिधी व्हावा!” अशी भावनिक हाक सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिक देत आहेत. ही मागणी आहे शिवसेना नेते योगेश जाधव यांच्यासाठी, ज्यांनी आपल्या सामाजिक कार्याने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!

गेल्या अनेक वर्षांपासून योगेश जाधव यांनी ‘देव धूत’ म्हणून ओळख मिळवत अनेक गावांमध्ये सामाजिक कार्य केलं आहे. गावात पाण्याची टंचाई असो, गरजूंना वैद्यकीय मदत हवी असो, की कोणतीही सामाजिक समस्या असो, योगेश दादांनी नेहमीच धैर्याने आणि तत्परतेने पुढाकार घेतला आहे. पाणीटंचाईच्या काळात गावकऱ्यांसाठी टँकर उपलब्ध करून देणे, आजारी व्यक्तींसाठी आर्थिक आणि मानसिक आधार उभा करणे, यासारख्या कार्यांनी त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आहे.

अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार: मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

आता, स्थानिक राजकारणात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जिल्हा परिषदेच्या अनेक सर्कलमधील नागरिक एकच मागणी करत आहेत – “योगेश दादा, आता आमच्या सर्कलमधून निवडणूक लढा!” हा आवाज केवळ मागणी नसून, त्यांच्या कार्याप्रती असलेल्या विश्वासाचं आणि आदराचं प्रतीक आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्कलमधील अनेक नागरिक त्यांना उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत.

संतापजनक: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, दोन आरोपी अटकेत

सध्या योगेश जाधव कोणत्या सर्कलमधून निवडणूक लढवणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे– त्यांच्या मागे तालुक्यातील जनतेचं खंबीर समर्थन आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि लोकांशी असलेलं नातं पाहता, त्यांचं राजकीय पाऊल तालुक्यातील जनतेसाठी निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!