लोणार, (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यात असलेल्या येवती गावाच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. सरपंच रामेश्वर कायंदे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली आणि गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. या सभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांचीही निवड करण्यात आली.
शेतकरी उत्पादक कंपनी साठी सरकारी योजनांमधून अनुदान आणि सहाय्य कसे मिळवावे?
समितीच्या अध्यक्षपदासाठी विठ्ठल कांगणे आणि प्रताप विष्णू सानप यांच्यात स्पर्धा होती. या निवडीसाठी गुप्त मतदानाची पद्धत अवलंबण्यात आली. एकूण १५४ ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले. यात विठ्ठल कांगणे यांना ८७ मते मिळाली, तर प्रताप सानप यांना ६७ मते मिळाली. अशा प्रकारे विठ्ठल कांगणे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
महिलांना घरबसल्या उद्योगासाठी 35% अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
या सभेला ठाणेदार गजानन सानप, ग्रामसेवक राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक ग्रामस्थ हजर होते. नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल कांगणे यांचे कृषी उपसभापती कारभारी सानप, नारायण कायंदे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सानप, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन जाधव, राजू कायंदे, रघुनाथ सानप आणि दिपक कायंदे (नॅशनल अँटी करप्शन बुलढाणा) यांनी अभिनंदन केले.